बेळगाव : रणझुंझार शिक्षण संस्था निलजी संचालित रणझुंझार हायस्कूल निलजीमध्ये रणझुंझार शिक्षण संस्था व रणझुंझार को.ऑप.क्रे. सोसायटी निलजी यांच्या सौजन्याने कै. वामनराव मोदगेकर स्मृती निमित्त एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार मल्टी पर्पज को. ऑप.क्रे. सोसायटीचे चेअरमन तसेच कै. वामनराव मोदगेकर यांचे सुपुत्र रमेशराव वा.मोदगेकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थ्यीनींनी ईशस्तवन व स्वागत गीताने केली. कै. वामनराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन तसेच दिपप्रज्वलन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रणझुंझार को.ऑप. क्रे. सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल पाटील सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ही जी व्याख्यानमाला आहे ती २३ वर्षे अखंडपणे सुरू आहे. अन त्याचा या पूर्व भागामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना भरपूर असा फायदा होत आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात रमेशराव मोदगेकर सरांनी या व्याख्यानमालेले आपण तज्ञ शिक्षकांची नेमणूक करतो. जेणेकरून दहावीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. अन विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण व्हावेत. अन हीच या व्याख्यानमालेची खरी श्रद्धांजली ठरेल.
रणझुंझार हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वाय. पी. पावले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कै. वामनराव मोदगेकर सरांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतला. कार्यक्रमाला रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विमलताई अशोकराव मोदगेकर, संचालक मारुती गाडेकर, अमर मोदगेकर, सिद्राय वर्पे, आजचे गणितज्ञ पी. आर. पाटील सर मुख्याध्यापक शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी, रणझुंझार हायस्कूलचे सहा.शिक्षक शहापूरकर सर होते.बकार्यक्रमाला कणबर्गी, मुचंडी, सांबरा, मुतगा, बसरीकट्टी व निलजी हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. मन्नूरकर आणि आभार एन. व्ही. आपटेकर सरांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta