Thursday , March 5 2026
Breaking News

बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेत मंगळवारी प्रा.युवराज पाटील

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय आयोजित पन्नासाव्या बॅ नाथ व्याख्यानमालेतील मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी चौथे पुष्प गुंफण्यासाठी युवा व्याख्याते प्रा युवराज पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा अल्पपरिचय पुढील प्रमाणे
ते लोकराजा शाहू ॲकॅडमीची संस्थापक असून लेखक, प्रेरणादायी वक्ता, म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत.
मानसशास्त्र, मराठी व इतिहास हे त्यांचे अभ्यासविषय असून एम सी इ डी कोल्हापूर व पुणे येथे व्यक्तीमत्व विकासाच्या कार्यशाळेतील मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य येथे साधन व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाणी व स्वच्छता या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
‘स्पीड ब्रेकर’ व ‘चंद्रप्रकाशाच्या झळा’ ‘टेन्शन फ्री व्हा’! या बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले असून या तिनही पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रबोधन क्षेत्रातील कार्यास अनेक पारितोषिके व पुरस्कार प्राप्त झाली आहेत.
महाराष्ट्रात व कर्नाटक मध्ये अनेक महत्वाच्या व्यासपीठावर महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर हजारो लोकांचे प्रबोधन केले आहे. दुरदर्शन, आकाशवाणी कोल्हापूर येथे युवकांसाठी मार्गदर्शन केले असून डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरींग लोहगाव पुणे येथे पाच वर्षे विद्यार्थी समुपदेशक म्हणून काम पाहीले आहे.
“तणाव मुक्त व्हा” या विषयावरील त्यांचे व्याख्यान असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *