बेळगाव : प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत बेळगाव येथील मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली असून शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्या सौ. महादेवी भावनूर यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
तत्पूर्वी, वडगाव येथील ज्योती हत्तरवाड (50) आणि तिची मुलगी मेघा हत्तरवाड, तसेच भाजप महिला कार्यकर्त्या कांचन कोपर्डे यांचे पती अरुण कोपर्डे आणि महादेवी भावनूर अशा चार जणांचा मृत्यू झाला. महादेवी हनुमंत भावनूर यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
बेळगाव येथील कुंभमेळ्यातील मृतांची नावे
महादेवी भावनूर – शिवाजी नगर
अरुण कोपर्डे – शेट्टी गल्ली
ज्योती हत्तरवाड– वडगाव
मेघा हत्तरवाड- वडगाव