Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव महापालिकेच्या जुन्या कार्यालयात भीषण आग

Spread the love

 

महत्त्वाची कागदपत्रे जळाली

बेळगाव : रिसालदार गल्लीतील जुन्या महापालिका (तहसीलदार कार्यालय) कार्यालयातील गोदामाला अचानक आग लागण्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली.
रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाला आज गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. बंद असलेल्या गोदामातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आगीचा सदर प्रकार उघडकीस आला.
आगिची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम हाती घेतले. पाण्याची फवारणी करून अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून आगीत कागदपत्रे जळाली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *