बेळगाव : शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
दोन दिवसांपूर्वी शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याची समाजकंटकांनी भीषण हत्या केली होती. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. बेळगावातही मंगळवारी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध करत, मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर म्हणाले, कर्नाटकासारख्या प्रगत राज्यात समाजासाठी काम करणाऱ्या ५ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे हे निषेधार्ह आहे. या घटना राज्य सरकारने गांभीर्याने घ्याव्यात. या हत्यांच्या मागे असलेल्या मुस्लिम संघटनांवर बंदी घालावी. हर्षच्या हत्येत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. एकंदर हर्षच्या हत्येवरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. बेळगावातही श्रीराम सेनेने त्याच्या मारेकऱ्यांना अटक करून मागे असलेल्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …