
बेळगाव : सीमा भागातील वंचित मराठी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतूने पदरमोड करून गेली नऊ वर्षे चालविलेल्या या व्याख्यानमालेचा अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून इयत्ता दहावीच्या परिक्षेत केवळ टक्केवारी मिळविणे हा या व्याख्यानमालेचा हेतू नसून जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे व आत्मनिर्भर बनने व समस्येला संधीचं स्वरूप देवून गतीमान होणं हा आहे. अभियंता, समाजसेवक व शिक्षणप्रेमी आर. एम. चौगुले यांच्या प्रेरणेतून चाललेल्या या व्याख्यानमालेला उज्ज्वल भविष्य आहे. या प्रेरणादायी कार्याची दखल इतरांनीही घ्यावी, या व्याख्यानमालेत सहभागी विद्यार्थ्यांनी तनमन लावत अभ्यास करावा असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ यांनी काढले.
रविवारी मराठी विषयाचे व्याख्यान होते. बेळगाव परिसरातील ठळकवाडी हायस्कूलचे नामवंत शिक्षक सी. वाय. पाटील यांचे व्याख्यान होते. मण्णूर, हिंडलगा, बेळगाव, आंबेवाडी, सुळगा, बेनकनहळ्ळी, बेक्कीनकेरे, उचगाव, चिरमुरी, कुद्रेमनी येथील बहुसंख्य विद्यार्थी या व्याख्यानमालेचा लाभ घेत आहेत.
या प्रसंगी विश्वभारत शिक्षण संस्थेच्या हिंडलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. रवी तरळे, मण्णूर हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री. चंद्रकात राक्षे, पर्यवेक्षक भरमा चौगुले व इतर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta