
बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकास आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालक युवक ठार तर मागे बसलेला युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुने बेळगाव नाक्याजवळ बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे. अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव मंजुनाथ होसकोटी वय 25 रा. सुळेभावी असे असून निंगाप्पा होसमनी वय 25 रा. सुळेभावी हा युवक जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार मयत मंजुनाथ यांचा हात माग व्यवसाय असून बाजारात साड्या देण्यासाठी ते सुळेभावीहून बेळगावला आले असता परत जातेवेळी जूने बेळगाव नाक्या जवळील पेट्रोल पंपाजवळ दुचाकी दुभाजकला आदळली त्यात मयत मंजुनाथ याच्या तोंडाला जबर मार लागला होता त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर निंगाप्पा जखमी झाला आहे. बेळगाव दक्षिण रहदारी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta