बेळगाव : हिंडलगा येथील रुद्रा जीम या व्यायाम शाळेचे शरीर सौष्ठवपटू ऋतिक पाटील आणि महेश गवळी यांनी नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या मि. एशिया -2025 या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत स्पृहणीय यश मिळविले आहे.
युनायटेड इंटर कॉन्टिनेन्टल बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशन (युआयबीबीएफ) संस्थेच्यावतीने आयोजित उपरोक्त स्पर्धा गेल्या रविवारी 16 फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेच्या खुल्या गटामध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या हिंडलगा येथील रुद्रा जिमच्या ऋतिक पाटील याने मि. एशिया कनिष्ठ विभागाच्या स्पर्धेत रौप्य पदक हस्तगत केले. त्याचा सहकारी महेश गवळी याने खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक मिळविला. या दोन्ही होतकरू शरीर सौष्ठवपटूंना बेळगावचे आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू व मि. वर्ल्ड नागेंद्र मडिवाळ यांचे मार्गदर्शन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे प्रोत्साहन लाभत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta