बेळगाव : जे.एन.यू विद्यापीठाचे प्राध्यापक, फ्रेंच भाषेचे अभ्यासक, साहित्यिक व विचारवंत डॉ. शरद बाविस्कर गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आज बेळगावमध्ये दाखल झाले. सांबरा विमानतळावर प्रबोधिनीचे सचिव व मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधिनीचे सदस्य इंद्रजीत मोरे उपस्थित होते. डॉ. शरद बाविस्कर हे शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वा मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम व बेळगाव मधील मराठी भाषा प्रेमी नागरिकांसाठी त्यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta