
कावळेवाडी : शिक्षण हे माणसाला माणूस बनवतं.आपण बोलीभाषा बोलली पाहिजे तरच जोडले जावू शकतो लेखक हा वेगळा नाही तो स्वतंत्रपणे विचार कागदावर उतरवत असतो कवी लेखकांनी आपण कोण तरी वेगळे असल्याचे भासवून समाजातून दूर जाऊ नये. समाजात जे घडतंय ते स्पष्टपणे लिहावे. कथा ही वास्तव हवी जिवंत, काळजाला स्पर्श करून मनं जिंकणारी असावी. घटना, प्रसंग विषमता, संघर्ष, भेदभाव हेच विषय लेखकाला लिहितं करतात.
स्वतःला सिद्ध करण्यासाठी लिहिले पाहिजे. ते समाधान शब्दात मांडता येणार नाही. तेव्हा आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहत जा. जे पटत नाही ते कथेतून लिहा काळजाला भिडणारं साहित्य हे परिवर्तन घडवतं. आपल्या विविध कथा कशा सुचल्या, त्याचे अगदी सहज सोप्या भाषेत कथन करुन रंगत आणली कथा बीज तुम्हीच संवेदनशील मनानं शोधून काढा लिहितं व्हा अशा शब्दांत राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कथा लेखन मार्गदर्शन कार्यक्रमात त्यांनी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर चौगले उपस्थित होते.
बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सुरवातीला रोपट्याला पाणी घालून प्रा. परसु गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यिनीनी गोड सुरेल आवाजात स्वागत गीत सादर करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले महात्मा गांधी फोटो पूजन कवी बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते झाले.
उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष वाय पी नाईक, पी आर गावडे यांनी शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आपल्या प्रास्ताविकात वाय पी नाईक यांनी वर्षभर घेण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा घेऊन विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, या हेतूने साहित्याची गोडी निर्माण व्हावी, तसेच मराठी भाषा विकास मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने हे मराठी भाषा संवर्धनासाठी उपक्रम राबविले जात आहेत असे स्पष्ट करून कृतज्ञता व्यक्त केली.
प्रा. परसु गावडे यांनी मातृभाषा ही जगण्याची भाषा आहे संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संवाद साधला पाहिजे. आजुबाजूला घडणाऱ्या घटना गांभीर्याने पहात जावं. त्यातून साहित्य निर्मितीसाठी आवश्यक असते वाचन चिंतन मनन करून व्यक्त व्हा रंगकर्मी म्हणून नाटक एकांकिका स्पर्धेत सहभागी झाल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
कवी बसवंत शहापूरकर यांनी ग्रामीण परिसरात अस्सल मराठी रुजलेली आहे. बोली भाषेत जीवन जगणं हेच मराठी भाषा संवर्धनासाठी पूरक आहे अवतीभवतीच्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून कविता स्फुरते असे मौलिक विचार व्यक्त केले.
कवी पत्रकार शिवाजी शिंदे यांनी गावातील साहित्यप्रेमीनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा तरुण पिढी नी पुढं होऊन वाचन, लेखन करावे. जे लिहितात, वाचन संस्कृती जोपासतात त्यांच्या संगतीत राहून जीवन समृद्ध करावे वाय पी नाईक यांनी चालवलेली चळवळ कौतुकास्पद आहे असे प्रशंसोद्गागार विचार व्यक्त केले.
यावेळी प्रा पी व्ही नाकाडी, पी आर गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात शंकर चौगले यांनी आपल्या समोर एखाद्या थोर व्यक्तींचा आदर्श ठेवून कार्यरत रहा.चरित्रे वाचा. पुस्तके आपणांस मोठं करतात. संस्कारीत पिढी निर्माण होण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक आहे. संत गाडगेबाबांचा अभंग.. गोपाला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला खूप छान आवाजात गाऊन, विचार व्यक्त केले.
व्यासपीठावर रवि राजमाने वाय पी नाईक, शंकर चौगले, प्रा परसु गावडे, बसवंत शहापूरकर शिवाजी शिंदे, प्रा पी व्ही नाकाडी, पी आर गावडे, पांडुरंग नाईक, निवृत्त शिक्षक नाना पाटील, अर्जुन चौगुले, यशवंतराव मोरे तेजस्विनी कांबळे, रेखा शहापूरकर मंगल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन भाग्यश्री कदम यांनी केले आभार दीपा जो. मोरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta