बेळगाव : श्रीक्षेत्र सोगल (ता बैलहोंगल) येथील सोमेश्वर यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. रविवार दिनांक ९ ते मंगळवार दिनांक ११ तारखेपर्यंत सोमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून रुद्राभिषेक,दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सात पासून शिव भजन शिव कीर्तन आधी कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी सकाळी सहा ते नऊ पर्यंत महामस्तभिषेक, दुपारी महाप्रसाद, हणबरहट्टी येथील हिरेमठाचे बसवलिंग शिवाचार्य स्वामी यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी चार वाजल्यापासून रथोत्सवाला प्रारंभ होईल. पाच वाजता धर्मसभा संपन्न होईल.
सोमवारी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पार्वती परमेश्वर अक्षतारोहण विवाह सोहळा संपन्न होणार आहे. रात्री दहा वाजून ४० मिनिटांपासून शिव भजन कीर्तन आदी कार्यक्रमावर आहेत. मंगळवारी सकाळी सहा वाजता रुद्राभिषेक, दुपारी महाप्रसाद, दुपारी चार वाजल्यापासून सोमेश्वर महारथोत्सव होणार आहे
मडीवाळेश्वर मठ होसुर गंगाधर महास्वामी, प्रभूदेव डोंगर येथील श्री शिवयोगेश्वर महास्वामी, बसव गोपाल निलमाणिक्य मठ बंडीगणीचे चक्रवर्ती दानेश्वर महास्वामी,मुरुसावीर मठ बैलहोंगल चे प्रभू निळकंठ महास्वामी, वीरगोटचे अडवी लिंग महाराज, अवधूत अज्ञान मठ सोगल येथील चिदानंद महास्वामी, स्वर्गानंद सोगलचे मोहनानंद स्वामी, यांच्यासह वास्तुतज्ञ सी.जी हिरेमठ (बुधीहाळ) आदी उपस्थित राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta