बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘पाखरांनो घ्या उंच भरारी’ या प्रेरणा गीताने केली. यासाठी संगीत शिक्षण सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या साथीने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते. कीर्ती कुबल व अथर्व तुपारे या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पाचवीचे विद्यार्थी अथर्व तुपारे व तन्मयी पावले यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर संयोगिता हुंदळेकर, गौतम पावशे, प्रसाद मोळेराखी, संस्कृती गुरव, कौस्तुभ चौगुले, प्रथमेश चांदिलकर, आर्यन पाटील या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. मुलांना ध्येयापर्यंत जाण्यासाठी समर्पक असा संदेश शाळेतील शिक्षिका माजी महापौर संज्योत बांदेकर यांनी दिला. शाळेतील शिक्षक बी. एम. पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसांशी घोषणा केली. आदर्श विद्यार्थी म्हणून प्रसाद बसवंत मोळेराखी व आदर्श विद्यार्थिनी म्हणून श्रेया परशराम धामणेकर यांची निवड करण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली. अध्यक्ष मनोगत सुभाष ओऊळकर व सुरेश पाटील यांनी मांडले. शाळेने दिलेली शिदोरी पुढे घेऊन जाणे, प्रामाणिकपणे प्रयत्न करणे तसेच कोणतेही यश गाठत असताना शॉर्टकट नको असे मनोगतात व्यक्त केले. प्रतापसिंह चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी एका प्रतिज्ञेचे वाचन केले. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी व वर्गशिक्षिका प्रतिभा मसुरकर व माधुरी पाटील यांच्या मार्गदर्शनाने पार पाडली. यावेळी शिक्षण संयोजक नीला आपटे, गजानन सावंत, इंद्रजीत मोरे, सविता पवार, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पाचवीच्या विद्यार्थिनी वेदिका कोकीतकर व वृंदा भांदुर्गे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta