
बेळगाव : आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथे आज दिनांक 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून श्री मंगाई देवी महिला मंडळ या महिला मंडळाची स्थापना व उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. प्रतिमा पवार या होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून सौ. प्रतिभा सडेकर निवृत्त मुख्याध्यापिका या होत्या. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती सौ. श्रुती एन. एस. एडिशनल सुप्रीडेंट पोलीस बेळगाव या होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. शिवानी उमेश पाटील व माजी नगरसेविका सुधा भातकांडे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गणेश पूजनाने करण्यात आली. महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव भागातील सफाई कामगार महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षीय भाषणात सौ. प्रतिमा पवार यांनी महिला मंडळ स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला तर प्रमुख वक्त्या सौ. प्रतिभा सडेकर म्हणाल्या की, महिलांनी संसाराच्या जबाबदारीतून स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे. महिला मंडळाच्या माध्यमातून स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न महिलांनी केला पाहिजे. महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रित येऊन आपल्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा. यावेळी सौ. शिवानी पाटील व सुधा भातकांडे यांचे महिला दिनाच्या शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा पवार यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय सौ. रेखा परब यांनी केला. महिला दिनाचे औचित्य साधून श्री. मंगाई देवी महिला मंडळातर्फे महिलांसाठी संगीत खुर्ची आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाला महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta