Thursday , March 5 2026
Breaking News

मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्धरित्या होळी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या होळी कार्यक्रमाला अधिकारी, जवान आणि प्रशिक्षणार्थी जवान उपस्थित होते. मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. रांगोळी काढून होळीची लाकडे रचण्यात आली होती. मंत्रपठण झाल्यावर ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. होळी पेटवण्यात आल्यावर होळीच्या भोंवती रिंगण करून उपस्थितानी गोल फिरत शंखनाद केला. होळी पुजानाचे पौरोहित्य पंडित श्रीकृष्ण पाठक यांनी केले. यावेळी उपस्थितानी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देऊन जल्लोष केला.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *