Sunday , March 16 2025
Breaking News

काँक्रीट मिक्सर लॉरी धावत्या कारवर उलटली: दोन जण गंभीर जखमी

Spread the love

 

बेळगाव : केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर काँक्रीट मिक्सर लॉरी धावत्या कारवर उलटल्याने कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर काँक्रीट मिक्सर लॉरी केए-25 एमडी 6506 क्रमांकाच्या कारवर उलटली. या अपघातात बागलकोट येथील रहिवासी असलेले दोघेजण गंभीर जखमी झाली. सुदैवाने संबंधित दोघांच्या जीवावर न बेतता ते जखमी झाले असले तरी कारचा मात्र संपूर्ण चुराडा झाला आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबतची माहिती मिळताच रहदारी पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ बचावकार्य हाती घेऊन क्रेनच्या सहाय्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले.
सदर घटनेची रहदारी उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कंग्राळी खुर्द शाळेत आर्थिक गैरव्यवहार!

Spread the love  एसडीएमसीची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा बेळगाव : कंग्राळी खुर्द प्राथमिक मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *