बेळगाव : तारांगण अखिल भारतीय साहित्य परिषद आणि जननी ट्रस्ट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्वाचा कौतुक सोहळा हा महिलांच्या कार्याचा गौरव समारंभ केला जातो. याही वर्षी हा समारंभ कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या डॉक्टर शकुंतला गिजरे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार
दिनांक 22 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेल्या आणि स्वतःची ओळख निर्माण केलेल्या महिलांनी समाजासमोर एक आदर्श महिला म्हणून उदाहरण ठेवलेल्यांचा सन्मान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. दत्तप्रसाद गिजरे आणि डॉ. मंजुषा गिजरे या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये पतीच्या विश्वास सार्थ ठरवणाऱ्या सीए श्रीमती वनिता बिर्जे, अष्टपैलू व्यक्तिमत्व शिक्षकी पेशातील निवृत्तीनंतर समाज कार्य करणाऱ्या शुभांगी पाटील, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सविता हेब्बार, सक्षम पालकत्व निभावणाऱ्या सुनीता बिर्जे, अंधशंकरची नेत्र संजीवनी भाग्यश्री मुतगेकर, वेदांत फाउंडेशनच्या अध्यक्षा समर्पित शिक्षिका सविता चंदगडकर, अपंग पतीचे जीवन फुलवणारी गृहलक्ष्मी मनाली कुगजी, कराटे कताण स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कुमारी ईश्वरी मडोळकर यांचा गौरव केला जाणार आहे.