बेंगळुरू : मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीचा निषेध करण्यासाठी विविध कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंददरम्यान चक्क म. ए. समितीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आपला शंड शमवून घेतला.
बंगळुरूमध्ये कन्नड समर्थक संघटनांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. म. ए. समितीची प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे आयोजन करून आपला संताप व्यक्त केला. कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी बेंगळुरू टाऊन हॉलसमोर एकत्र येऊन अंत्ययात्रा काढली. टाऊन हॉल ते फ्रीडम पार्क अशी अंत्ययात्रा काढण्यात आली, फ्रीडम पार्क येथे समितीवर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आला समितीवर बंदी घालावी, समितीच्या नेत्यांना कर्नाटकातून हद्दपार करावे अशा घोषणा देऊन समितीचा निषेध करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta