जागतिक कविता दिनानिमित्त आयोजन
बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळातर्फे जागतिक कविता दिनानिमित्त सोमवार दि. 24 मार्च 2025 रोजी संध्या. 5.30 वाजता शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथे श्रीमती अश्विनी ओगले यांच्या निवासस्थानी कवयित्री उर्मिला शहा यांचा ‘माझं घायाळ आभाळ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध कवयित्री उर्मिला शहा या आपल्या कवितांचे सादरीकरण करून त्यांचा काव्यप्रवास उलगडणार आहेत.
कवयित्री उर्मिला शहा शब्दगंध कवी मंडळाच्या जेष्ठ कवयित्री असून कवितेकडे केवळ छंद म्हणून नव्हे तर गंभीरपणाने पाहणाऱ्यापैकी त्या एक आहेत. त्यांचे ‘प्राजक्तधारा’ आणि ‘घायाळ आभाळ’ हे कवितासंग्रह तर ‘मनाची डायरी’ हा चारोळी संग्रह प्रसिद्ध आहेत. एक वेगळी आंतरिक उलघाल त्यांच्या कवितेतून दिसते. मनाचा तळ ढवळून निघावा अन शब्दातून तो प्रकट व्हावा इतकी सहज सुंदर रचना करणाऱ्या कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात. यानिमित्ताने त्यांच्या काव्य लेखनामगाची प्रेरणा जाणून घेता येणार आहे.
त्यानंतर शब्दगंध कवी मंडळांच्या सदस्यांचे काव्य वाचन आणि कवितेवर चर्चा होईल. तरी या कार्यक्रमाला कवी आणि काव्य रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शब्दगंधचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta