
बेळगाव : विजयपूर येथील एमबीएची विद्यार्थिनी ऐश्वर्या लक्ष्मी हिने बेळगावातील पीजी रूममध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे.
तरूणीच्या आत्महत्येमागचे कारण अशी माहिती आहे की, विजयपूर जिल्ह्यातील चडचन येथे राहणाऱ्या ऐश्वर्या लक्ष्मी व आकाश यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होते. पण आकाश हा दुसऱ्याच तरुणीच्या प्रेमात पडला होता. यातून ऐश्वर्या व आकाश यांच्यात वारंवार भांडणे होत होती. यातून आकाशने ऐश्वर्याला दुसऱ्या तरुणीसाठी सोडले. यामुळे ऐश्वर्या प्रचंड नाराज झाली होती, आत्महत्या करण्यापूर्वी तिने आकाशला मेसेज टाकला होता की तिच्या मृत्यूला तू आणि दुसरी तरुणी जबाबदार आहे. नंतर तिने खोलीत येऊन गळफास लावून घेतला.
ऐश्वर्या मेसेज करत असतानाच आकाश तिच्या पीजी रूममध्ये आला आणि दरवाजा तोडून तिचा मोबाईल चोरून पळून गेला. ऐश्वर्याच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी ऐश्वर्याच्या मृत्यूचे कारण शोधून काढले आणि आकाशला ताब्यात घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta