खानापूर : गुरुवर्य वाय. एन. मजुकर फाउंडेशनच्या वतीने वाय. एन. मजुकर यांच्या गुरुवारी (ता. ३) होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे कोल्हापूर येथील सिनेट सदस्य व प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मधुकर पाटील हे व्याख्यान देणार आहेत. ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची जबाबदारी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम येळ्ळूर येथील चांगळेश्वरी हायस्कूलच्या सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विविध संघ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक व शिक्षणप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.