बेळगाव : आदिती शंकर पाटील राहणार कंग्राळी बी.के. ही विद्यार्थिनी सध्या मराठी विद्यानिकेतन शाळेत इयत्ता दहावी या वर्गात शिकत आहे.
मंगळूर या ठिकाणी झालेल्या सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित स्कूल फेडरेशन ऑफ इंडिया राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आदिती शंकर पाटील यांनी 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत 17वर्षाखालील स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान पक्के केले आहे. या स्पर्धेसाठी अदितीने जोरदार तयारी केली आहे. यासाठी तिला शाळेच्या क्रीडा शिक्षिका पूजा संताजी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धा 06 ते 12 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये मणिपूर इम्पाल या ठिकाणी संपन्न होणार आहेत.
या 17वर्षाखालील स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी आदिती पाटील आपली दहावीची बोर्डाची परीक्षा देऊन सहभागी होणार आहे. तिला परीक्षेसोबतच राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, गजानन सावंत, क्रीडा शिक्षक दत्ता पाटील, महेश हागिदळे, श्रीधर बेन्नाळकर, पूजा संताजी, ज्येष्ठ समाजसेवक शिवाजीदादा कागणीकर, शाळा सुधारणा समिती आणि शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.