
बेळगाव : गाडी आडवी लावण्याचे कारण विचारल्यामुळे वकिलाला मारहाण केल्याची घटना कणबर्गी परिसरात घडली. या घटनेत वकील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बेळगावच्या कणबर्गी येथे वकील राहुल ट्यानगी हे आपल्या नातेवाईकांसमवेत दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. गाडी आडवी घातल्याचे निमित्त साधून संशयितांनी वटारून पाहिल्याने त्याबाबत विचारणा केली असता सदर वाद निर्माण झाला. वकील राहुल ट्यानगी घरात परतल्यानंतर काही वेळाने १५ जणांच्या टोळक्याने त्यांना फोन करून बाहेर बोलावले आणि त्यांच्यावर बेदम हल्ला केला. या हल्ल्यात वकील राहुल यांच्या हाताला, चेहऱ्याला आणि दातांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta