बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला आज 25 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने माजी नगरसेवकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 4 एप्रिल 2000 सालि तत्कालीन महापौर व माजी आमदार संभाजीराव पाटील व तत्कालीन नगरसेवक यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका सभागृहात एकमताने ठराव संमत करून धर्मवीर संभाजी चौक येथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती त्याला आज पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. बेळगाव शहरातील या प्रमुख चौकाला ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. संभाजी महाराज गोवा स्वारीवर जात असताना जत्तीमठ येथे आल्याचे इतिहासात उल्लेख आहेत त्यामुळे या चौकाला धर्मवीर संभाजी महाराज चौक असे दिले गेले आहे. बेळगाव होणाऱ्या ऐतिहासिक शिवजयंती वेळी विविध मंडळाच्या वतीने ज्योत आणल्या जातात त्या ज्योतींचे स्वागत देखील याच चौकात केले जाते.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेवक पंढरी परब यांनी विचार व्यक्त केले. माजी महापौर संज्योत बांदेकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, रेणू मुतगेकर, माया कडोलकर, मीनाक्षी चीगरे, मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रशांत भातकांडे, अंकुश केसरकर, संजय मोरे, निखिल शिंदे आदी उपस्थित होते.