बेळगाव (प्रतिनिधी) : टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेट जवळील बॅरिकेड्स प्रायोगिक तत्त्वावर हटविण्यात आले आहेत. टिळकवाडी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून याबाबत पावले उचलावीत अशी मागणी येथील काही नागरिकांनी सातत्याने लावून धरली होती. या मागणीचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आले आहे. याप्रमाणे नजीकच्या काळात दुसरे रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहतूक पहिल्या रेल्वे गेट मार्गे वळवावी लागणार आहे. याचा विचार करून आता निरीक्षणासाठी पहिल्या रेल्वे गेटवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.