बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हाॕकी प्रशिक्षण शिबीर दि. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 5 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गुळाप्पा होसमनी व सचिव सुधाकर चाळके यांनी दिली.
प्रशिक्षण शिबिरात 10 वर्षापासून 21 वर्षांपर्यंत 170 मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. प्रशिक्षक उत्तम शिंदे, नामदेव सावंत, गणपत गावडे, प्रशांत मंकाळे, सुधाकर चाळके आदी प्रशिक्षण देतआहेत.
प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी गौरव जाधव 7829222691, चेतन दोडमनी 8867213306, वैदुर्या नाईक 7026719824, प्राजक्ता निलजकर 7022506074 यांचेशी संपर्क साधावा.
उद्घाटन समारंभ
उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीराचा उद्घाटन समारंभ सोमवार दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वा. होणार असून यावेळी कर्नल सी रामनाथकर, डेप्युटी कमांडंट एम एल आय आर सी बेळगाव, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी व माजी उपमहापौर आनंद चव्हाण हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असे हॉकी बेळगावचे सदस्य प्रकाश कालकुंद्रीकर कळवितात.