बेळगाव : मराठा मंदिर येथे रविवारी संपन्न होत असलेल्या सहाव्याअखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज नगरी सज्ज झाली आहे.
ग्रंथ दिंडीला खाऊ कट्यापासून सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार असून मराठा मंदिर मध्ये सकाळी दहा वाजता हे संमेलन सुरू होईल.
यंदाचे बेळगाबात सलग होणारे हे सहावे समेलन असून संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील हे आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार असून श्री. डी. बी. पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण यांच्याबरोबरच डॉ. शरद गोरे, सीमा कवी रविंद्र पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. एकंदर तीन सत्रात संपन्न होणाऱ्या या संमेलनासाटी कार्यकर्ते जोमाने कामास लागले असून मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात मराठी दर्जामुळे या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी भाषिकांनी आणि खास करून शिक्षक, पत्रकार आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.