
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक तक्रारी आणि जनक्षोभ असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बैलहोंगल तालुक्यातील थिगडी गावात घडली. शिवशंकर बसवेण्णाप्पा परसप्पागोळ असे दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे.
सहा महिन्यांपूर्वी शिवशंकर यांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. यामुळे त्यांनी अन्न आणि पाणी सोडले होते. त्यांना गंभीर अवस्थेत बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta