
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये प्रशस्त ग्रंथालय व प्रयोगशाळेच्या नुतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.. महात्मा फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.राजाभाऊ पाटील, प्रमुख पाहुणे श्री.जयंत नार्वेकर, श्री. सुभाष ओऊळकर, डॉ.पी.डी. काळे, प्रा.विक्रम पाटील, प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी’आम्ही प्रकाशबिजे ‘हे प्रेरणा गीत सादर केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी केले. यानंतर शाळेच्या ग्रंथालय नुतनीकरणाचे उद्घाटन जेष्ठ मार्गदर्शक प्राचार्य व्ही.ए. पाटील, श्री.जयंत नार्वेकर, ॲड. राजाभाऊ पाटील व श्री. सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते करण्यात आले.. तसेच प्रयोगशाळा नुतनीकरणाचे उद्घाटन डॉ.पी.डी. काळे, डॉ. विजय देसाई, श्री. अरुण देसुरकर, प्रा. विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.. मराठी विद्यानिकेतन शाळेला यावर्षी 35 वर्षे पूर्ण झाली आहेत यानिमित्ताने शाळेच्या स्थापनेपासून शाळेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्या संस्थापक सदस्यांचा सहकुटुंब सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुभाष ओऊळकर, अनंत जाधव, प्रा.व्ही. ए. पाटील, प्रा.आनंद मेणसे, डॉ. पी.डी. काळे, अरूण देसुरकर, दौलतराव राणे, के.बी. फगरे, मनोहर पाटील, गंगाराम जायाण्णाचे, आप्पासाहेब काकतकर यांच्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच द.म.शि मंडळाच्या गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य ॲड. राजाभाऊ पाटील, प्रा. विक्रम पाटील, डॉ.विजय देसाई, प्रा. आर के पाटील, डॉ. दिपक देसाई, नारायण खांडेकर, पी.पी. बेळगावकर, प्रा.एम.बी. निर्मळकर, श्री.बाळाराम पाटील, प्रा. अनंत देसाई, श्री.किरण पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. श्री. जयंत नार्वेकर यांनी शाळेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, मुख्याध्यापक गजानन सावंत, इंद्रजीत मोरे व शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
सविता पवार यांनी सूत्रसंचालन व प्रा. सुरेश पाटील यांनी आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta