बेळगाव : बाग परिवाराचा काव्य वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम जत्तीमठात आटोपशीरपणे पार पडला. लग्नसराई, सणासुदीत सुद्धा बाग परिवाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
प्राध्यापिका मनीषा नाडगौडा यांनी प्रेम तुझे नी माझे, आणि रंगस्त्रीत्वाचा, अस्मिता आळतेकर यांनी माठातील पाणी आणि सुट्टी एके सुट्टी, स्मिता किल्लेकर यांनी ज्ञानगंगा व सुकाणू, रोशनी हूंद्रे यांनी मैत्री आणि रुदाली, गुरुनाथ किरमिटे यांनी होळी आणि आठवण, अशा कविता सादर केल्या. चंद्रशेखर गायकवाड आदी कवींनीही आपल्या कविता सादर केल्या.
कवितांचा आशय सामाजिक भावनाशील, वास्तव, प्रकृती अशा विषयांनी नटलेला होता. प्रास्ताविक स्मिता किल्लेकर यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा नाडगौडा तर अस्मिता आळतेकर यांनी आभार मानले.