बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देसूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने शनिवार दिनांक 12 एप्रिल ते सोमवार दिनांक 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
शनिवार दिनांक 12 एप्रील 2025 रोजी सकाळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील दलित बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि काँग्रेस युवा नेते रमेश गोरल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि दलित बांधव याप्रसंगी उपस्थित होते.