बेळगाव : बेळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत पै हॉटेलच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर पाईपलाईन घालण्याचे काम सुरू असताना अचानक भूस्खलन होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे.
एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या कामगाराचा शोध सुरू आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली असून पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta