बेळगाव : दोन भावांमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पुनर्वसन हाणामारीत होऊन परिणामी मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी ११ वाजता धामणे गावात घडली.
लक्ष्मण भरमा बाळेकुंद्री (वय २८) हे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे, तर मारुती भरमा बाळेकुंद्री (वय ३०) हा आरोपी आहे. दोन्ही भावंडे बसवान गल्ली, धामणे येथे रहात होते. बुधवारी दुपारी क्षुल्लक कारणावरून दोन्ही भावंडांमध्ये वाद निर्माण झाला. यादरम्यान लहान भावाला मोठ्या भावाने लोखंडी सळईने मारहाण करून ढकलून दिले. यावेळी लक्ष्मण बाळेकुंद्री हा तरुण घरातील कट्ट्यावर जाऊन आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला व त्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही दोन्ही भावंडांमध्ये सतत वाद होत होते. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले असून आई दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. अशा परिस्थितीत व्यसनाधीन भावंडांकडून झालेल्या वादावादीत एकाच मृत्यू झाल्याने डोळ्याने अंध असलेल्या आईसमोर अंधार पसरला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि आरोपी मारुती याला अटक केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta