बेळगाव : बेळगाव शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. चव्हाट गल्ली परिसरात 4 ते 5 कुत्र्यांनी शिवराज जयानंद शंकपुरे वय वर्ष 11 राहणार चव्हाट गल्ली याच्यावर हल्ला करून चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेकडे तसेच संबंधित प्रभागाच्या नगरसेवकाकडे वारंवार मागणी करून देखील प्रशासन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरली आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकन मोहीम देखिल अर्धवट पडली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. पहाटे किंवा रात्री फिरायला जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चव्हाट गल्ली परिसरातील नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta