Monday , December 15 2025
Breaking News

जायंट्स मेनच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांना श्रद्धांजली व दहशतवाद्यांचा तीव्र निषेध

Spread the love

 

बेळगाव : जम्मू काश्मीर येथील पहलगाम मधील बेसनूर खोऱ्यात झालेल्या भीषण दहशतवादी संघटनेच्या गोळीबारात २८ भारतीय पर्यटकांची गोळ्या घालून भीषण हत्या करण्यात आली याचे तीव्र पडसाद संपूर्ण भारत देशात प्रत्येक भारतीयांच्या मनात उमठलेले असून जायंट्स मेन या संघटन्येच्या वतीने बुधवारी सायंकाळी सात वाजता हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाजवळ संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद व इतर नागरिकांच्या उपस्थितीत या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सेक्रेटरी मुकुंद महागावकर, मधु बेळगावकर, लक्ष्मण शिंदे, हुतात्मा चौक प्रभागाचे नगरसेवक श्री. जयतीर्थ सवदत्ती यांची आवेशपूर्ण भाषणे झाली. प्रत्येकाने निषेध व्यक्त करून दहशतवादी मुर्दाबाद अशा दणदणीत घोषणा दिल्या त्यानंतर प्रत्येकाने मेणबत्ती पेटवून आपल्या भावना प्रकट केल्या. शेवटी उपस्थितानी दोन मिनिटे स्तब्ध राहून या हल्ल्यात बळी पडलेल्या हिंदू पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी माजी अध्यक्ष विकास कलघटगी, सुनील भोसले, सुनील मुतगेकर, उपाध्यक्ष श्री अरुण काळे, अरविंद देशपांडे, राहुल बेलवलक, दिगंबर किल्लेकर, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, महादेव केसरकर, आनंद कुलकर्णी, गावडू पाटील, वाय एन पाटील, अजित कोकणे, पद्मप्रसाद हुली, सौ. गीता हुली, सदानंद शिंदे व इतर नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *