Friday , March 6 2026
Breaking News

पहलगाममधील हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनचे आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : पहलगाममधील हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनने आंदोलन केले आणि केंद्र सरकारकडून दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली. यावेळी केंद्र सरकारला निवेदनही सादर करण्यात आले.
आज बेळगाव बार असोसिएशनने पहलगाममधील हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ एक आंदोलन केले आणि केंद्र सरकारकडून दहशतवाद्यांविरोधात कडक कायद्यांची मागणी केली. बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णवर यांनी सांगितले की, काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदूंच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेसारख्या देशांमध्ये अशा प्रकारचे कृत्य केलेल्या व्यक्तींविरुद्ध तात्काळ कडक कारवाई केली जाते. भारतातही अशा दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी. बांगलादेशमध्येही हिंदूंच्या विरोधात अत्याचार होऊ लागले आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कठोर निर्णय घेऊन हिंदूंच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.या आंदोलनात बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि अनेक सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *