Monday , September 21 2026
Breaking News

काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेकडून तीव्र निषेध

Spread the love

 

बेळगाव : काश्मीरमधील पहेलगाममध्ये झालेल्या हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येविरोधात बेळगावमध्ये श्रीराम सेनेच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारकडे कठोर कारवाई करावी याची मागणी केली.
काश्मीरमधील पहलगाम भागात हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज श्रीराम सेनेने तीव्र निषेध आंदोलन केले. या आंदोलनावेळी केंद्र सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून, या दहशतवादी घटनेत सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रवीकुमार कोकितकर बोलताना म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय देश आहे. मात्र काश्मीरमध्ये हिंदूंवर केलेली ही कायरतापूर्ण कृत्यं देशात भीती पसरवण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, कर्नाटकासारख्या राज्यांतून काश्मीरला गेलेल्या हिंदू प्रवाशांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी हे लक्षात ठेवावं की भारतातील हिंदूंनी बांगड्या घातलेल्या नाहीत. जर अशा हल्ले सुरूच राहिले, तर आम्हीही रस्त्यावर शस्त्र घेऊन उतरू आणि योग्य प्रत्युत्तर देऊ. यावेळी श्रीराम सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *