Wednesday , April 22 2026
Breaking News

पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का! भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती

Spread the love

 

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सराकरने कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने गेल्या कित्येक दशकांपासून चालू असलेल्या पाकिस्तानसोबतच्या सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली आहे. सोबतच सरकारने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणेही थांबवले आहे. सोबतच भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी लवकरात लवकर भारत सोडावा, असा आदेशही सरकारने दिला आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दिल्लीमध्ये सीसीएसची बैठक झाली. साधारण अडीच तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तासोबतच्या सिंधू पाणीवापटाच्या कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अशी घोषणा केली. पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

सिंधू पाणीवाटप करार नेमका काय आहे?
सिंधू पाणीवाटप करार हा 1960 साली करण्यात आला होता. या कराराअंतर्गत रावी, सतलज आणि बियास या नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले. तर सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले. 1960 सालापासून याच कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाणीवाटप होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जेव्हा-जेव्हा बिघडले तेव्हा-तेव्हा हा करार भारताने रद्द करावा, अशी मागमी केली जात होती. आता मात्र भारताने या कराराला प्रत्यक्ष स्थगिती दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *