
बेळगाव : 25 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचे विशेष अधिकारी व महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांची बेळगावला धावती भेट. श्रीनगर येथे आतंकवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांचे प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्या उपचाराची विचारपूस करण्यासाठी व पुढील उपचार चांगल्या पद्धतीने नियोजित करण्यासाठी आज सकाळी बेळगाव विमानतळावरून दिल्ली येथे रवाना. तेथून आज श्रीनगरला कनेक्टिंग विमानाने पोचणार. ह्या धावत्या भेटीदरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर श्री. मालोजीराव अष्टेकर व महाराष्ट्र एकीकरण समिती वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी भेट घेऊन सीमा प्रश्नाविषयी व सीमा भागातल्या समस्यांवरती चर्चा करण्यात आली. श्री. मंगेश यांनी सर्व बाबींवर लवकरात लवकर उपमुख्यमंत्री यांना माहिती देऊन बैठकीचे नियोजन करू असे सांगितले. श्री. आपटेकर यांनी सीमा भागातील 865 गावांच्या वैद्यकीय मदतीविषयी चर्चा केली व येणाऱ्या काळात इथल्या अजून काही मोठ्या हॉस्पिटल ना वैद्यकीय सेवेच्या पॅनलवरती घेण्यासाठी विनंती केली. या भेटीदरम्यान टिळकवाडी येथील दक्षता हॉस्पिटलला भेट देऊन डॉ. पी. बी. लाड यांच्याकडून हॉस्पिटल व तेथील रुग्णांविषय माहिती घेतली. ह्या भेटी प्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta