बेळगाव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावच्या वतीने आज शिवछत्रपती जयंती पारंपरिक पद्धतीने, भक्तिभाव आणि उत्साहाने साजरी करण्यात आली.
डॉ. सोनाली सरनोबत (बेळगाव जिल्हा महिला अध्यक्षा) आणि दिलीप पवार (कार्याध्यक्ष, बेळगाव जिल्हा) यांच्या हस्ते शिवमूर्ती पूजन करण्यात आले. यावेळी डी. बी. पाटील, बसवराज म्यागोटी, संजय भोसले, सतीश बाचीकर, रोहन कदम, चंगप्पा पाटील, राहुल पवार, किरण कवळे, अॅड. बेळगोजी, गीता चौगुले, कांचन चौगुले आणि विद्या सरनोबत उपस्थित होते.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला वंदन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या शौर्याचा गौरव करणारी भाषणे झाली. सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमास विशेष उर्जा दिली.
Belgaum Varta Belgaum Varta