
बेळगाव : बेळगाव शहरात येत्या 1 मे 2025 रोजी काढण्यात येणारी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडण्याची सक्त सूचना पोलीस प्रशासनाने केली आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आयोजित शहरातील श्री शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगाव, शहापूर शिवजयंती उत्सव महामंडळ आणि श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपरोक्त सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे मिरवणूक शांततेने सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने आवश्यक अन्य सूचना करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta