
बेळगाव : प्यास फाउंडेशनने विकसित केलेला तलाव ग्रामपंचायतीकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला आहे. जलसंधारणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जलस्त्रोत विकास करणाऱ्या प्यास फाउंडेशनने एक तलाव विकसित करून तो ग्रामपंचायतीकडे सुपूर्त केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, प्यास फाउंडेशनचे कार्य समाजहिताचे असून पाण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम देवाच्या कार्यासारखे आहे. ग्रामीण भागातील पाण्याच्या गरजा लक्षात घेता अशा उपक्रमांची मोठी गरज आहे.राज्य सरकारकडून ग्रामीण भागातील तलाव भरण्याच्या योजनांसाठी सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निधीचा उपयोग करून जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचा सरकारचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta