
बेळगाव : हिंदू कार्यकर्ते सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजप महापालिका विभागाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. शहरातील चन्नम्मा चौकात भाजपचे शेकडो कार्यकर्ते एकवटले होते. हातात बॅनर आणि पोस्टर्स घेऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकार आणि सिध्दरामय्यांविरोधात घोषणा देत सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पोस्टर्स फाडून यावेळी निषेध नोंदविण्यात आला. ही हत्या योजनाबद्ध असून राज्य सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही, असा आरोप निदर्शकांनी केला. सुहास शेट्टी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत भाजपने राज्यभर आंदोलनाची चेतावणी दिली आहे. या आंदोलनात बेळगाव भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta