
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावाजवळ सोमवारी दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
बैलहोंगल ते बेळगाव जोडणाऱ्या महामार्गावर अपघात झाला. बेळगावहून बैलहोंगलकडे जाणारी किआ कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या अल्टो कारला ओव्हरटेक करताना धडकली. अल्टो कारमधील पती आयुम, त्याची पत्नी आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. आणखी एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात नेण्यात आले आहे.
किआ कारमध्ये माजी आमदार आर. व्ही. पाटील यांचा मुलगा होता. तोही या अपघातात जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बेळगावातील एका खाजगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृतांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयात पाठवले आहेत. ही घटना बैलहोंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta