Saturday , November 7 2026
Breaking News

दोन कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावाजवळ सोमवारी दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
बैलहोंगल ते बेळगाव जोडणाऱ्या महामार्गावर अपघात झाला.  बेळगावहून बैलहोंगलकडे जाणारी किआ कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या अल्टो कारला ओव्हरटेक करताना धडकली. अल्टो कारमधील पती आयुम, त्याची पत्नी आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. आणखी एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात नेण्यात आले आहे.

किआ कारमध्ये माजी आमदार आर. व्ही. पाटील यांचा मुलगा होता. तोही या अपघातात जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बेळगावातील एका खाजगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृतांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयात पाठवले आहेत. ही घटना बैलहोंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *