Monday , December 8 2025
Breaking News

कलाश्रीच्या सतराव्या भाग्यवान विजेत्या ठरल्या मनाली पाटील

Spread the love

 

बक्षिसादाखल मिळाले अर्धा तोळा सोने
कंग्राळी खुर्द – कलाश्री उद्योग समुहाच्या वतीने आयोजित चौथ्या योजनेतील सतराव्या ड्रॉच्या भाग्यवान विजेत्या देवघनहट्टी च्या मनाली पी. पाटील ठरल्या. त्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अर्धा तोळे सोने देण्यात आले.
कलाश्री सभागृहात प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शीतल बर्डे (चेअरमन भाग्योदया महिला को -ऑपरेटिव्ह सोसायटी कंग्राळी), लक्ष्मण खेमजी कासर्लेकर (चेअरमन वनदेवी मल्टिपरपज को-ऑपरेटिव्ह सोसायटी जांबोटी बेळगांव), सुनील गणपतराव चिघूळकर (मुख्या. माऊली विद्यालय कणकुंबी), पुंडलिक लक्ष्मणराव पाटील (संचालक वनदेवी को-ऑपरेटिव्ह सोसायटी जांबोटी बेळगांव), विठ्ठल राजगोळकर हे उपस्थित होते. प्रथम मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर त्यांना कलाश्री ग्रुपच्या वतीने भेटवस्तू व बुके देऊन प्रकाश डोळेकर व सुकन्या डोळेकर यांचे हस्ते गौरविण्यात आले. मान्यवरांनी मनोगते व्यक्त करताना कलाश्री उद्योग समुह व सोसायटी यांची ग्राहकांमधील विश्वासार्हता पटलेने कलाश्रीने कौतुकास्पद प्रगती केली आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख अतिथी हस्ते भायवान विजेत्यांच्या चिठ्ठया काढून नाव घोषित करण्यात आली.

बंपर बक्षिस मनाली पाटील यांना तर उपविजेते मिक्सर ग्राईडरचे मानकरी 1) रोहिणी नाकाडी बैलूर, 2) उदय कुमार इदगल बागेवाडी, 3) यमुना उमेश रेमांचे धामणे बेळगांव, 4) नारायण यल्लाप्पा मुतगेकर हंगरगा हे ठरले. तसेच दुपारी 4 ते 4.30 या वेळेत उपस्थित असलेले भाग्यवान ग्राहक 1) सुमन गोवेकर (बैलूर), 2) सातेरी सावंत (देसूर), 3) सुनील आजरेकर (विनायक नगर), 4) सिद्दाप्पा एस. तुक्कानाचे (देवगणहट्टी) यांनाही मान्यवरांचे हस्ते भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. विजेत्यांचे कलाश्री उद्योग समुहा वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी कलाश्री सोसायटी ठेव योजनेतील मागिल ड्राचे भाग्यवान विजेत्याना 43 इंच कलर टी व्ही, रोख रक्कम व कॉर्नर सोफासेट ही देण्यात आले तसेच हितचिंतकांच्या इ. 10 वीत विशेष गुणवत्ता मिळवलेल्या उत्कर्षा उत्तम पाटील, समर्थ कृष्णा पाटील व श्रावणी विष्णू डोळेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मनाली कुगजी यांनी अपंग रामचंद्र कुगजी याना पती म्हणून स्वीकारून यशस्वी संसार करून एक आदर्श समाजासमोर ठेवला असलेने या दांपत्याचाही सन्मान करण्यात आला. यावेळी वधूवर सूचक मेळावाही मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांसाठी सोसायटी संचालक, ग्राहक, डीलर, सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच साखर 30/- किलो प्रमाणे आलेल्या ग्राहकांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी डी पाटील यांनी तर आभार वाय बी पवार यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *