
बेळगाव : बिम्स रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रात्री उशिरा एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बेळगावातील विश्वेश्वरय्या नगर येथील संपिगे रोड येथील रहिवासी प्रभावती विष्णू मिरजकर यांना १५ मे रोजी बिम्समध्ये उपचारासाठी दाखल केले होते. १९ तारखेला त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे।अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तथापि, मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणतेही आपत्कालीन डॉक्टर किंवा परिचारिका उपलब्ध नव्हत्या, तेव्हा प्रभावती विष्णू मिरजकर यांनी अखेरचा श्वास घेतला. बिम्स रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रभावतीचा मृत्यू झाल्याचे सांगत मिरजकर यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


Belgaum Varta Belgaum Varta