
बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सप्तगिरी सेवा प्रतिष्ठान बेळगाव आणि विश्व मध्व महा परिषद बेळगाव यांच्या वतीने १५ जून रोजी बेळगाव येथील राणी चन्नम्मा नगर येथील श्री सत्यप्रमोद सभागृहात सर्व शाखांमधील ब्राह्मणांचा वधू वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात प्राचार्य श्रीधर हुकेरी आणि डॉ. दत्तप्रसाद गिझरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले की, या दोन्ही संस्थांनी समाजातील सर्व सदस्यांना फायदा व्हावा यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. विवाह हा हिंदू कुटुंब व्यवस्थेचा एक मूल्य-आधारित भाग मानला जातो. या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी या संस्था नेहमीच आघाडीवर असतात. गेल्या वेळी जेव्हा या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा सुमारे ३०० वधू आणि ४५० वरांची नावे नोंदणी झाली होती आणि सुमारे २५ विवाह यशस्वीरित्या पार पडले होते. म्हणूनच, यावेळीही मोठ्या संख्येने वधू-वर एकत्र यावे आणि आयुष्यभर वैवाहिक बंधन प्रस्थापित करावे. असे आवाहन त्यांनी केले.
यासंदर्भात अधिक माहिती करता राघवेंद्र कट्टी ७३५३३५११५९, श्रीधर हालगत्ती ७३३८२३३५९८, श्रीदेवी कुलकर्णी ९४८०६७७९७६, ज्योती शेलिकेरी ९८४५२४९६३२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta