
बेळगाव : रायबाग येथील राम मंदिर मठाचे लोकेश्वर स्वामीजी यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, तर त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेकळी गावातील मठाच्या स्वामीजींनी त्यांच्या मठात येणाऱ्या एका भक्ताच्या मुलीला अन्य जिल्ह्यात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर मुडलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स्वामीजींच्या राम मंदिर मठाला भेट दिली तेव्हा मठात घातक शस्त्रे सापडली. अत्याचार झालेल्या तरुणीला स्वामीजींनी महालिंगपूर बस स्टँडवर सोडल्याचे कळते. सध्या पोलिसांनी आरोपी स्वामीजींना ताब्यात घेतले आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta