
बेळगाव : मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने दहावी उत्तीर्ण झालेल्या मराठी माध्यमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरातील गुणानुक्रमे पहिले दहा विद्यार्थी, बेळगाव ग्रामीण विभागातून गुणाानुक्रमे पहिले 10 विद्यार्थी आणि खानापूर तालुक्यातील गुणांनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी अशा एकूण 30 विद्यार्थ्यांना एका विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकासाठी रुपये दहा हजार, द्वितीय क्रमांकासाठी सहा हजार रुपये, तृतीय क्रमांक चार हजार रुपये, चौथ्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये , पाचव्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि सहावा ते दहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी एक हजार रुपये अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष, डॉ. गोपाळ पाटील यांनी दिली आहे. निवड झालेल्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना स्थळ व तारीख कळविण्यात येणार असून अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. गोपाळ पाटील दूरध्वनी क्रमांक ९६१९५८८६०६ या क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta