
बेळगाव : गोकाक शहरातील महालिंगेश्वर कॉलनीत आज सकाळी मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.
मृत मुलीचे नाव कीर्ती नागेश पुजारी (वय ३) असे आहे. या घटनेत चार वर्षाची मुलगी जखमी झाली. मोठी बहीण खोलीत झोपली असताना भिंत कोसळली. त्यामुळे एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी मुलींचे पालक घराच्या दुसऱ्या खोलीत झोपले होते असे समजते.
जखमी मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मृत मुलीचा मृतदेह गोकाक सरकारी रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे. गोकाक शहर पोलिस ठाण्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta